Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीवर निवडलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा परभणीत सत्कार

परभणी जिल्हा व शहर कॉग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीच्या पुर्नरचनेमध्ये परभणी जिल्ह्यातील ज्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील व तसेच बाळासाहेब देशमुख यांची निवड झाली आहे तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीसपदी हरिभाऊ शेळके व सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांची निवड झाली आहे.

ॲड.श्री. मुजाहेद खान यांची चिटणीस पदावर निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन जिल्हा कॉग्रेस कमीटी शनीवार बाजार परभणी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉग्रेस कमीटीचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आ.सुरेश वरपुडकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.सुरेश देशमुख,उपमहापौर भगवानराव वाघमारे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ घाडगे, धोंडीराम चव्हाण, महीला जिल्हाध्यक्ष जयश्रीताई खोबे उपस्थित होत्या.

प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार यांनी केले. यावेळी ईनामदार यांनी सांगीतले कि या पाच नेत्यांची निवड करून प्रदेश अध्यक्ष यांनी परभणी जिल्हा कॉग्रेस कमीटीला नवसंजिवनी व बळकटी दिली व येणाऱ्या मनपा व नगर परिषद निवडणूकी मध्ये कॉग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अभिनंदनाचा ठराव ही यावेळी हातवर करुन सर्वानुमते पास करण्यात आला.

यावेळी मनपा सभापती गुलमीर खान,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष गफ्फार मास्टर,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फुलारी,महीला शहराध्यक्षा दुर्राणी,कॉग्रेस नेते बंडु पाचलींग,किसान सेल चे जिल्हाध्यक्ष श्रिधर देशमुख,सेवादल जिल्हाध्यक्ष सुरेश देसाई,ओ.बि.सी.सेल जिल्हाध्यक्ष तुकाराम साठे,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष शे.मतीन भाई,सोशलमिडीया जिल्हाध्यक्ष सुहास पंडीत,जिल्हा उपाध्यक्ष खदिरलाला हाश्मी,पवन निकम,पालम तालुकाध्यक्ष सिरसकर,पाथरी तालुका अध्यक्ष विश्वनाथ थोरे,नगरसेवक विशाल बुधवंत,गणेष देशमुख,विनोद कदम,अमोल जाधव,साबेर मुल्ला,

युवक कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय देशमुख ,युवक कॉग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अकब जहागीरदार,युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन जवंजाळ,युवक महासचिव सईद अहेमद डिगांबर खरवडे,युवक तालुकाध्यक्ष राजेश रेंगे ,सत्तार पटेल,अमित पाचलींग,तब्बु पटेल,सतीश रेंगे ,मदन शिंदे,कदीर पठाण ,प्रसिनजित सवनेकर जिल्ह्यातील कॉग्रेस चे सर्व सेलचे पदाधीकारी, नगरसेवक,जि.प.सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.