Take a fresh look at your lifestyle.

सेलूत २४१ रुग्णांची नेत्र तपासणी; ५७ रूग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

सेलू :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील शारदा विद्यालयात अर्जुन बोरूळ मित्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी २४१ जणांची तपासणी करण्यात आली.

शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अर्जुन बोरूळ यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुजाभाऊ भिसे, चंद्रशेखर नावडे, मिलींद सावंत, डॉ अरुण जाधव, मुश्ताक भाई, शेख दिलावर, सोमनाथ फरताड़े, गोविंद हरने, रामभाऊ बागल, प्रल्हाद भिसे, अक्षय बागल, अमोल बाबर, अनिकेत मस्के, गणेश दराडे यांची उपस्थिती होती. दरम्यान या शिबिरात २४१ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ५७ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर रूग्णांवर मुंबई, उदगीर व जालना येथील नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.