Take a fresh look at your lifestyle.

लसीकरण करून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल ! जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला सेलू येथे इशारा

सेलू (डाॅ विलास मोरे) : सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, नागरिकांनी एकत्र गर्दी करू नये, सर्वांनी लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. जे नागरीक लसीकरण करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी सेलू येथे दिला आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल स्वतः जिल्हाभर भ्रमंती करत आहेत. दरम्यान मंगळवारी ता १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता त्या सेलू येथे बाजारपेठेत घरोघरी जाऊन नागरीकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर शहरातील लसीकरण मोहीमेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.

नगर पालिका व आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, मुख्याध्याकारी निलेश सुंकेवार, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, अक्षय पल्लेवाड, अशोक कासार आदींची उपस्थिती होती…

Comments are closed.