Take a fresh look at your lifestyle.

नवीन ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अमलबजावणी करा ग्राहक पंचायतचे राज्य ग्राहक आयोगाला साकडे

परभणी :- ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये अंतर्भूत केलेल्या बाबींची पुर्तता करून ग्राहकांना तातडीने न्याय देण्यासाठी नवीन ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणीच्या वतीने निवेदनाद्वारे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संतोष काकडे यांच्या कडे केली आहे.

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संतोष काकडे हे 28 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये पारीत झाला असला तरी खऱ्या अर्थाने 20
जूलै 2020 पासून प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही नवीन कायद्यान्वये अनेक बाबींची पुर्तता करणे बाकी आहे. माध्यमांच्या (मध्यस्थी कक्ष) नियुक्त्या तातडीने कराव्यात, अधिकृत ग्राहक प्रतिनीधींच्या नियुक्त्या कराव्यात, ऑनलाईन तक्रार दाखल करणे व त्याची सुनावणी घेणे. या सदंर्भातील आवश्यक ती त्रुटी दुर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, आस्थापनातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरीत भरावीत, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची इमारत अत्याधुनिक व सुसज्ज बनवून येथे संरक्षण भिंत बांधावी. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डाॅ विलास मोरे, जिल्हा संघटक धाराजी भुसारे, के.बी. शिंदे, सोपान टोले, अब्दुल रहिम, मंजुषा कुलकर्णी, प्रा. विठ्ठल वडकुते, विजय चट्टे, गोपाल कच्छवे, लक्ष्मण पवार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Comments are closed.