Take a fresh look at your lifestyle.

परभणी जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर ! मुसळधार पावसात या गावातील बैलजोडी गेली वाहून

परभणी/प्रतिनिधी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (दि.6) रात्रीपासून तर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझिम सुरू आहेत. सर्वत्र होत असलेल्या या पावसामुळे, नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडत असल्यासमोर आली आहे.

सोमवारी दुपारी सेलू तालुक्यातील कुपटा या गावात बैलजोडी पाण्यामध्ये वाहून गेल्याची दुर्घटना घडलीे. तर गंगाखेड तालुक्यातील सायळा सुनेगावातील एक शेतकरीही पुराच्या पाण्यात वाहून गेला.  मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावात रस्ता ओलांडणारी एक बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली.

याच गावातील दोन युवक या पाण्यामधून रस्ता पार करताना ळचूी मात्र पोहता आल्याने ते बचावले आहेत.
पालम शहरासह तालुक्यात 7 सप्टेंबर रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुयणी गावात अनेक ठिकाणी पूराचे पाणी घुसले आहे. तसेच गुगळी धामणगाव येथील लेंडी पुलावरून पाणी वाहत आहे.लेंडी, गळाटी नदीसह ओढ्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून पालम शहराशी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Comments are closed.