परभणी/प्रतिनिधी प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार
दिनांक ५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.
दिनांक ६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर परभणी, लातूर, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक ७ सप्टेंबर रोजी हिंगोली,परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.
दिनांक ८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के. डाखोरे यांनी दिली आहे.
Comments are closed.