Take a fresh look at your lifestyle.

ऋषीश्वर ज्वेलर्सच्या पाणपोई जलसेवेचे उद्घाटन

सेलू येथे आठवडी बाजार परिसरात ऋषीश्वर ज्वेलर्सचे संचालक ज्ञानेश्वर बुरे यांच्या वतीने शनिवार ता. १९ रोजी पाणपोई जलसेवेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डाॅ विलास मोरे, सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे, प्रसिद्ध उद्योजक ओमप्रकाश मेहता, ऋषीश्वर ज्वेलर्सचे संचालक ज्ञानेश्वर बुरे, रामेश्वर बहिरट, राहुल शेडुते, प्रभाकर पावडे, भगवान  पावडे, सोपान जाधव, रुस्तुम जडे, सचिन पवाडे, जगताप साहेब, भास्कर आडळकर, राजू खरात, सुनील टाक, बंडू मगर, वरद बुरे आदी उपस्थित होते. ऋषीश्वर ज्वेलर्सच्या वतीने आठवडी बाजार परिसरात गेल्या सात वर्षांपासून पाणपोई जलसेवेच्या माध्यमातून उन्हाळ्यात हजारो नागरिकांची तहान शमविण्याचे कार्य केले जाते. आता उन्हाळा चांगलाच सुरू झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून पारा चाळीशी पर्यंत पोहोचला आहे. एरवी समाजसेवेच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधीं कडून शहरात अद्याप एकही पाणपोई सुरू केली नाही. शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर पाणपोई सुरू होणे गरजेचे आहे….

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.