Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…तालिबानला लष्करी प्रशिक्षण देण्यात ‘या’ पाक एजन्सीने कशी विशेष भूमिका बजावली ते जाणून घ्या

काबूल: तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अद्याप स्पष्ट झाली नाही. काबूल विमानतळावरील गोंधळादरम्यान तालिबानने तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रबळाचा वापर सुरू केला आहे. सरकार बनवण्याच्या कवायती दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान सरकारला मान्यता देण्याचा मुद्दावर विचारमंथन सुरू आहे. त्याचबरोबर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याच्या प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयची विशेष भूमिका समोर येत आहे.

पाकिस्तान-तालिबान संबंध आहेत दृढ

जिथे संपूर्ण जग तालिबानने अफगाणिस्तानमध्ये चालवलेल्या गोंधळाच्या घटनेने आश्चर्यचकित झाले आहे, परंतु पाकिस्तानकडून येणाऱ्या वक्तव्यांमुळे पाकिस्तान-तालिबान संबंध पुन्हा एकदा समोर येत आहेत. तालिबानला पाकिस्तानचे समर्थन नैतिकतेपेक्षा अधिक होते, हेहे हळूहळू स्पष्ट होत आहे. अनेक पाकिस्तानी नागरिक अफगाणिस्तान मधील तालिबानचा विजय साजरा करत आहेत. सोशल मीडियावर, तालिबानला रोखण्यात अमेरिकेचे अपयश आणि ‘भ्रष्ट घनी सरकार’ इत्यादींवर पाकिस्तानी नागरिक उघडपणे टोमणे मारत आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सहाय्यकांचाही समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या च्या वक्तव्यात संकेत

इम्रान खान यांनीही अशीच विधाने केली आहेत, अफगाणिस्तान क्षेत्रातील इंग्रजी भाषा शिक्षणाच्या सांस्कृतिक धोक्यांविषयी बोलताना, मानसिक गुलामगिरी लादली जात असल्याचे सांगून तालिबानने अशा गुलामगिरीची बेडी तोडली असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले. तालिबानला अधिकृत सरकार म्हणून ओळख देण्यात इम्रान सरकारने अद्याप कोणतीही घाई दाखवली नाही.

अमेरिकेच्या दहशतवादी विरोधी धोरणांना पाकिस्तानचा होता विरोध

अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धावर टीका करणारे इम्रान यांनी आपल्या वक्तव्यात “या प्रकरणात ‘सर्व बाजूंनी’ एक उपाय शोधला पाहिजे”, या वाक्यावर भर दिला. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी या महिन्यात म्हटले आहे की, “पाकिस्तानवर परिणाम होत असलेली अस्थिरता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेण्यास आम्ही तयार नाही. गेल्या 40 वर्षात पाकिस्तानला खूप त्रास सहन करावा लागला आहे.”

पाकिस्तानची सखोल भूमिका

अफगाणिस्तान मधील तालिबानचा प्रवास आणि तालिबानचा अफगाणिस्तानवर विजय या घटनांमध्ये पाकिस्तानचा जवळचा संबंध आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांच्या वाढीसाठी सुमारे 50 वर्षे योगदान दिले आहे. पाकिस्तानचे काही क्षेत्र ‘शक्तिशाली’ बनवण्याची रणनीती म्हणून त्यांनी तालिबानी दहशतवादी संघटनेस शक्य तेवढी मदत केली. यात त्यांना आर्थिक मदत, शस्त्र पुरवठा आणि लष्करी प्रशिक्षण देणे इत्यादि गोष्टींचा समावेश आहे. सर्व देश दहशतवादी संघटनांच्या विरोधात असताना पाकिस्तानने केलेल्या या कृत्यामुळे पाकिस्तानवर टीका होत आहे.

Comments are closed.