Take a fresh look at your lifestyle.

मार्च ते जून दरम्यान पाकिस्तानने केले ‘इतक्या’ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, ऐकून विश्वास बसणार नाही

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघण झाल्याच्या बातम्या येत असतात. पाकिस्तान काही केल्या सुधरण्याचे नाव घेत नाही. भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर पाकिस्तानकडून अनेकवेळा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले.

मंगळवारी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी अहवालाच्याच्या स्वरूपात ही माहिती दिली. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, जून 2021 पर्यंत पाकिस्तानकडून 664 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. मात्र, मार्च ते जून दरम्यान फक्त 6 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने  2020 मध्ये 5133 वेळा, 2019 मध्ये 3479 आणि 2018 मध्ये 2140 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीवर करार झाला होता.

कोरोनामुळे करतारपूर कॉरिडोर बंद

करतारपूर कॉरिडॉर प्रकरणावर खासदार गुरजीत सिंह औजला यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, कोविड -19 च्या साथीमुळे मार्च 2020 मध्येच करतारपूर कॉरिडॉरमधून यात्रेकरूंची ये-जा बंद झाली होती.

ते म्हणाले, पाकिस्तानमधील नॅशनल कमांड आणि ऑपरेशन सेंटरने भारतात कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे कारण देत एप्रिल 2021 पासून भारतातून सर्व प्रवासावर बंदी घातली आहे. मात्र, करतारपूर कॉरिडॉर पुन्हा कधी उघडणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Comments are closed.