Take a fresh look at your lifestyle.

पेन्शनरांनी बँकेतील गुंतवणूक व ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगणे गरजेचे : श्री चंद्रहास पटेल

सेलू (डाॅ विलास मोरे) :-  येथील पेन्शनर्स असोसिएशनच्यावतीने ‘सुरक्षित गुंतवणूक व ऑनलाइन व्यवहार ‘या विषयावर ,डॉ.श्री विनायकराव कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पेन्शनरांना मार्गदर्शन करतांना भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मॅनेजर चंद्रहास पटेल म्हणाले सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम अधिक व्याजदराचा हव्यास धरून अन्यत्र न गुंतवता राष्ट्रीयकृत बँका व पोस्टातील वेगवेगळ्या स्कीममध्ये  गुंतवा. शेअर्स व मॅच्युअल फंडात जास्त परतावा मिळू शकेल, परंतु कंपन्यांच्या सद्य:स्थितीची योग्य माहिती नसेल तर नुकसान होण्याची भीती असते.

आपल्या भाषणात ते  पुढे ऑनलाइन व्यवहाराच्या संदर्भात म्हणाले की बँकेतील लांबच्या लांब रांगा व गर्दी टाळायची असेल तर ऑनलाइन व्यवहार हा सुरक्षित आणि कँशलेस आहे. परंतु तो अचूकपणे करता आला पाहिजे. एटीएम कार्ड वापरतांना आपला पीन नंबर इतरांना माहिती होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. काही वेळा ‘मी बँकेतून बोलतो आहे, तुमची अमूक माहिती सांगा’ असा फोन येतो, अशा वेळी आपण सावध राहावे. कुठलीही माहिती देऊ नये. असे त्यांनीबजाऊन सांगितले.

यावेळीपेन्शनरांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य विनायकराव कोठेकर यांनी ऑनलाइन व्यवहार अचूकपणे करता यावेत यासाठी एखादी कार्यशाळा आयोजित करण्याची गरज प्रतिपादन केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र मुळावेकर यांनी तर सूत्रसंचालन नारायण ईक्कर यांनी केले. आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश देशपांडे, प्रकाश जोशी, भाऊराव झाल्टे, बाबूराव धामणगावकर, रघुनाथ देशमुख, शेख उस्मान आदींनी परिश्रम घेतले.

Comments are closed.