Take a fresh look at your lifestyle.

नूतन महाविद्यालयाच्या प्रेरणा अंकास विद्यापीठाचा पुरस्कार

सेलू :- येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रेरणा या वार्षिकांकास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नांदेड विद्यापीठाने नुकतेच आपले विविध पुरस्कार जाहीर केले. कोरोना संसर्ग व लॉकडाऊनमुळे 2019-20 चे पुरस्कार विद्यापीठाने या वर्षी जाहीर केले. त्यात नूतन महाविद्यालयाच्या प्रेरणा ‘अनंत वृत्त विशेष’ या पत्रमहर्षी अनंतराव भालेराव यांच्यावरील विशेषांकास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. तर सन 2020 – 21 च्या प्रेरणा ‘कोरोना संसर्ग विशेष’ या अंकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. कोरोना संसर्ग विशेषांकात कोव्हिड आजार, प्रतिबंधात्मक उपाय, काळजी यासंबंधीच्या लेखांबरोबरच कोरोना योद्धे, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आदींच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतींचा समावेश आहे.
विद्यापीठात नुकत्याच (दि.२डिसेंबर) संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात कुलगुरू व मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, मार्गदर्शक प्राध्यापक आणि विद्यार्थी संपादक मंडळास वितरीत करण्यात आले. या पुरस्कारामुळे नूतन महाविद्यालयाच्या प्रेरणा अंकास सातत्याने मिळणाऱ्या पुरस्कारांची परंपरा कायम राखली आहे.

□डॉ.बैनवाड यांना उत्कृष्ठ कार्यक्रमाधिकारी पुरस्कार

नूतन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रमेश बैनवाड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ.बैनवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच विद्यापीठात हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुर्ण…. डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.