Take a fresh look at your lifestyle.

नूतन संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.लोया तर डॉ.कोठेकर चिटणीस

सेलू : सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड प्रक्रिया मंगळवारी सर्वानुमते बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी डॉ.एस.एम.लोया यांची फेरनिवड, तर उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस म्हणून जयप्रकाश बिहाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. यानिमित्ताने स्थापनेपासून बिनविरोध निवडीची ८३ वर्षांची परंपरा संस्थेने कायम राखली आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून शिक्षणाच्या क्षेत्रात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे. सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठीच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळात अध्यक्ष : डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष : डी.के.देशपांडे, चिटणीस : प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस : जयप्रकाशजी बिहाणी, सदस्य : प्राचार्य द.रा.कुलकर्णी, सीतारामजी मंत्री, प्रकाशचंदजी बिनायके, प्रा.रंगनाथराव गात, डॉ.विजेंद्र नागोरी, दत्तरावजी पावडे, मकरंद दिग्रसकर, नंदकिशोरजी बाहेती, अजीजखाँ पठाण, राजेश गुप्ता, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांचा समावेश आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून निवृत्त मुख्याध्यापक अनिल केंधळीकर, तर सहायक म्हणून प्रा.ए.डी.कुलकर्णी, गिरीश लोडाया यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.