अरे बापरे…राज्यात डेल्टा प्लसची भीती वाढत आहे; रत्नागिरी, मुंबई नंतर ‘या’ ठिकाणी डेल्टा प्लसमुळे मृत्यू
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकाराचा धोका सातत्याने वाढत आहे (Corona Virus Delta Plus Variant). मागील २४ तासांत कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईनंतर आता रायगड मध्ये डेल्टा प्लसमुळे मृत्यू
एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील एका 63 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लस प्रकारामुळे मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर आता रायगडमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की, मृतकाचे वय 69 वर्षे होते, ते रायगडमधील नागोठणे येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये डेल्टा प्लस प्रकारामुळे मृत्यूची पहिली घटना कालच नोंदवली गेली. जुलै महिन्यात मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, ज्याचा अहवाल आता समोर आला आहे. अहवालानुसार, डेल्टा प्लस प्रकारामुळे महिलेचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरीही डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महिलेचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली
महाराष्ट्रात कोरोणाच्या डेल्टा प्लस प्रकारामुळे पहिलं मृत्यू 13 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. मृत महिलेचे वय 80 वर्षे होते. राज्य आरोग्य विभाग रत्नागिरी आणि मुंबई मध्ये डेल्टा प्लस प्रकारामुळे झालेल्या मृत्यूनंतर रणनीती आखत असतानाच रायगड जिल्ह्यातील या मृत्यूमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे.
नाशिक जिल्ह्यात 30 पेक्षा जास्त डेल्टा प्लसचे रुग्ण
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये डेल्टा प्लसच्या 30 रुग्णांची पुष्टी झाली आहे. सध्या हे नमुने जीनोम सिक्वन्सिंगसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत महाराष्ट्रात अनलॉकिंग सुरू आहे. राज्याच्या अनेक भागात निर्बंध शिथिल केले जात आहेत. तसेच राज्यातील ‘आर’ मूल्य (R Value) 1 पेक्षा जास्त आहे.
Comments are closed.