Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान मोदींची घोषणा: आता ग्रामीण भागातील लोकांनाही मिळणार बँक कर्ज, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, केंद्र सरकार देशातील सर्व भागात सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात, जमिनीच्या मालकीची कागदपत्रे लोकांना बँकेचे कर्ज घेण्यासाठी खूप मदत करतील. ते म्हणाले की, या दस्तऐवजाद्वारे देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोक त्यांच्या गरजेच्या वेळी सहज कर्ज घेऊ शकतील.

पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले की, ड्रोनच्या मदतीने जमिनीचे मॅपिंग करण्यात येत आहे. तसेच ज्यांची जमीन आहे त्यांना जमिनीच्या मालकीची कागदपत्रे दिली जात आहेत. सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत आता ग्रामीण भागातही बहुतांश सुविधा सहज उपलब्ध होतील.

जमिनीशी संबंधित वाद मिटवणे सोपे होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गावांमधील जमिनीचे ड्रोनद्वारे मॅपिंग केले जाईल. देशातील 6 राज्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे. जमीन मालकी योजना देशाच्या प्रत्येक गावात 2024 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या लोकांकडे अनेक पिढ्या जुन्या असलेल्या जमिनी आहेत. अशा परिस्थितीत सध्याच्या पिढीकडे त्यांच्या जमिनींचे कोणतेही कागदपत्र नाहीत. तसेच छोट्या जमिनीच्या तुकड्याचेसुद्धा बरेच मालक आहेत. यामुळे जमिनीच्या मालकीवरून होणार्‍या वादांची संख्याही वाढली आहे. अशा विवादांचे निराकरण करण्यात पीएम स्वामित्व योजना खूप मदत करेल. जर लोकांकडे जमिनीची कागदपत्रे असतील तर बँका त्यांना सहज कर्जही देतील.

तसेच जमिनीशी संबंधित भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल

प्रधानमंत्री भूमी-स्वामीत्व योजनेअंतर्गत मालमत्ता नामांकन प्रक्रिया सुलभ करण्यात येत आहे. केंद्राच्या या योजनेअंतर्गत, ड्रोनच्या मदतीने गावाचे, शेतजमिनीचे मॅपिंग करण्यात येईल. यामुळे जमीन पडताळणीची प्रक्रिया वेगाने होईल. तसेच, पीएम स्वामित्व योजना जमीन संबंधित भ्रष्टाचार रोखण्यात खूप मदत करेल. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांच्या आधारे बँक कर्ज घेण्याच्या सुविधेसाठी तरतूद करण्यात आली आहे.

Comments are closed.