Take a fresh look at your lifestyle.

काबूल विमानतळावर तालिबानने नाही तर ‘या’ आतंकवादी संघटनेने घडवला बॉम्बस्फोट, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू तर 130 जखमी

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ज्याची भीती होती ती घटना अखेर घडली. काबूल विमानतळाजवळ दोन स्फोट झाले आहेत, ज्यात वृत्त लिहिपर्यंत 43 लोक मरण पावले असून आणि 130 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकही जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वप्रथम पेंटागॉनने विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांची पुष्टी केली. प्रथमदर्शी हा हल्ला तालिबान्यांनी केला असे वाटत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला तालिबानने नाही तर इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने केला आहे.

तालिबानने यापूर्वीच इस्लामिक स्टेट असे हल्ले करू शकते याची भीती व्यक्त केली होते. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट हे दोन्ही कट्टरवादी असले तरी दोघांमध्ये बिलकुल जमात नाही. इस्लामिक स्टेटचा अफगाणिस्तान खोरासन बद्दल भीती व्यक्त करण्यात आली होती की ते मोठा हल्ला करू शकतात. खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीसूद्धा ही भीती व्यक्त केली होती.

जाणून घ्या आतापर्यंतच्या घडामोडींचा घटनाक्रम

-सर्वात प्रथम काबूलच्या विमानतळाजवळ स्फोट झाल्याची आली. मात्र, तोपर्यंत मृतांची संख्या आणि जखमींची संख्या याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. नंतर पेंटागॉननेही या हल्ल्याची पुष्टी केली. अमेरिकेचे संरक्षण सचिव जॉन किर्बी यांनी सांगितले की, पहिला स्फोट विमानतळाच्या एबी गेटवर झाला. यानंतर, दुसरा स्फोट विमानतळाजवळील बारून हॉटेलजवळ झाला, जिथे काही ब्रिटिश सैनिक थांबले होते.

-रशियन माध्यमांनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व प्रकारचे कामकाज बंद करण्यात आले आहे.

-अमेरिकेच्या मते – विमानतळाच्या बाहेर तीन संशयित दहशतवादी दिसले. त्यापैकी दोन आत्मघाती हल्लेखोर होते तर एक शस्त्रधारी आतंकवादी होता.

-युनायटेड किंगडमच्या (UK) संरक्षण मंत्रालयानेही दोन्ही स्फोटांची पुष्टी केली आहे. नाटो सैन्याने विमानतळावर उपस्थित असलेली सर्व विमाने त्यांच्या संरक्षणाखाली घेतली आहेत.

-स्फोटांनंतर काबूल विमानतळावर गोंधळाचे वातावरण असून, बॉम्बस्फोटानंतर अमेरिकन दूतावासाने अलर्ट जारी केला आहे. दूतावासाने लोकांना विमानतळाच्या दिशेने न जाण्यास सांगितले. दूतावासाने अॅडव्हायजरी जारी करताना म्हटले की, जे अमेरिकन नागरिक एबी गेट, ईस्ट गेट किंवा नॉर्थ गेट जवळ आहेत त्यांनी तेथून ताबडतोब निघून जावे आणि काबूल विमानतळाजवळ जाणे टाळावे.

-जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी या हल्ल्याला भयानक आणि विदारक म्हटले आहे. त्या म्हणाल्या, काबूल विमानतळावर देश सोडण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करण्यात आला. त्या लोकांना शांतता हवी होती पण त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे घृणास्पद आहे.

– तालिबानने काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांचा निषेध केला आहे. विमानतळाची सुरक्षा अमेरिकन सैन्याच्या हातात असल्याचे तालिबानने म्हटले आहे.  त्याचवेळी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, काबूल विमानतळाच्या सभोवतालची परिस्थिती खराब होत आहे. मात्र, विमानतळावरून बचावकार्य यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed.