Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी हितासाठी इथेनॉल निर्मिती वाढवावी लागेल : नितीन गडकरी

अहमदनगर : राज्यातील साखर कारखानदारीने शेतीत मोठा विकास केला. सहकार चळवळीची सुरवात नगर जिल्ह्यातून झाली. साखरेच्या दरावर कारखादारी चालते. कारखाने टिकले तरच शेतकरी टिकेल. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करु नये. साखरेच्या दराची आणि इतर बाबीचा विचार करता नवीन साखर कारखाना सुरु करण्याला परवानगी मिळू नये, नाही तर भविष्यात कारखानदारीची आवस्था बिकट होईल असे केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसासह तांदुळ, मका व इतर धान्यापासून इथेनॉल निर्मितीचे केंद्र सरकारने धोरण ठरवले आहे. पेट्रोलपेक्षा इथेनॉल चांगलेच आहे. त्यामुळे वाहनात इथेनॉलचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकार केंद्र सरकार ते खरेदीची हमी घेतेय असे गडकरी म्हणाले.

नगर येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकऱणाच्या ५२७ किलोमीटरच्या व ४ हजार २७ कोटी रुपयाच्या पंचवीस प्रकल्पाचे भूमीपुजन, लोकार्पन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, रोहित पवार, निलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे, माजीमंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डीले, अंकुश शिंदे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भानुदास मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, अंकुश काकडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘देशासाठी १६५० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. त्यामुळे जेवढे तयार होईल तेवढे भारत सरकार खरेदी करेल. आता इथेनॉल तयार करणारे उद्योग टाकण्यासाठी अर्ज येत आहेत. अमेरिका, ब्राझिलमध्ये शंभर टक्के इथेनॉलचा वापर होत आहे. दरवर्षी इंधन आयातीसाठी खरेदीसाठी १२ लाख कोटी रुपये खर्च होतात. इथेनॉल निर्मितीतून त्यातील ५ लाख कोटी रुपये कमी झाले तरी ते पैसे शेतकऱ्यांच्या खिशात जातील. साखरेच्या दरावर ऊसाची किंमत ठरत असल्याने हा प्रश्न जटील होत आहे. त्यामुळे त्यातून इथेनॉल निर्मितीच मार्ग काढू शकते.

विकासाचे परिवर्तन व्हायचे असेल तर पाणी, ताकद, वाहतुक, संपर्क या गोष्टी महत्वाच्या आहेत. नवेउद्योग येण्यासाठी चांगले रस्ते आणि त्यातून नवीन रोजगार निर्मिती हे गणित आहे. अमेरिका श्रीमंत म्हणून ‘चांगले रस्ते नव्हे तर चांगले रस्ते म्हणून अमेरिका श्रीमंत’ असे आहे. निमितीसोबतच रस्त्यावर येणाऱ्या नाले, पुलापासून पाणी आडवा, पाणी जिरवा उपक्रमही आम्ही राबवत आहोत. तेल आयातीवर १ लाख ६० हजार कोटी खर्च होत आहेत

Comments are closed.