Take a fresh look at your lifestyle.

सेलूत निरंकारी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

सेलू (डाॅ विलास मोरे) :- येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोमवारी ता 13 सप्टेंबर रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

सेलू येथील संत निरंकारीमंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ जनार्धन गोळेगावकर, निरंकारी मंडळाच्या प्रमुख लक्ष्मी मेहता, सेवा दल प्रमुख रवि लांडगे, प्रदीप शिंदें, बाळासाहेब चिंतामणी, प्रवीण वतारी, सचिन आडणे, रमेश सोनवणे, विशाल सहातोंडे, अशोक राऊत, सदाशिव गायकवाड, रघुनाथ कांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड, महानंदा सोनवणे, सुनीता ढगे, रुख्मिन धोंगडे आदींची उपस्थिती होती.

Comments are closed.