Take a fresh look at your lifestyle.

निम्न दुधना प्रकल्पाचे प्रलंबित कामे पुर्ण होण्याच्या आशा पल्लवित.

सेलू :-  सर्वपक्षीय लढ्यानंतर २०१६ साली पूर्णत्वास गेलेल्या निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचा उपयोग दोन्ही कालव्यांतर्गत केवळ १५ हजार हेक्टरवरील सिंचनासाठी होत आहे. मात्र उर्वरित ” ५० हजार हेक्टरील सिंचनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. याबाबत सेलू तालुका विकास कृती समीती व प्रहार जनशक्ती पदाधिकारी यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे कडे पाठपुरावा केल्यानंतर ना.बच्चुभाऊ कडू यांनी आराखडा सादर करण्याच्या सुचना विभागाला दिल्याने आत्ता दशकानंतर संपूर्ण सेलू तालुका ओलीताखाली येण्याची अशा उंचावली आहे.

सेलू तालुक्यात ३० मे १९७९ रोजी शासनाने निम्न दुधना प्रकल्पास मंजुरी दिली. त्यामुळे संपूर्ण तालुका ओलिताखाली येण्याची आशा शेतकऱ्यांना लागली. मात्र हा प्रकल्प निधीतील तरतुदीच्या अडथळ्यांत तब्बल तीन शतके गुंतला गेला. त्यानंतर २००८ मध्ये सुधारित आर्थिक तरतुदीनंतर अडथळ्यांची शर्यत संपली आणि २०१० साली धरणात पाणी साठविण्यात आले. पंतप्रधान सिंचाई योजनेअंतर्गत प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण होत नसल्याने पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईना.२८ एप्रिल २०१६ मध्ये  प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. तेव्हापासून पाच वेळा दुधना नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडावे लागले. मुबलक पाणीसाठा असतानाही त्याचा उपयोग होत नाही. तर डाव्या व उजव्या कालव्याच्या कामावर १७ कोटी ३९ लाख रुपये खर्च केले. परंतू पुर्ण क्षमतेने पाणी वाटप शक्य होत नाही. सेलू तालुक्यात आणखी दोन कालवे काढले तर शेतकरी सुखी होऊ शकतो याबाबत २१ जानेवारी रोजी सेलू तालूका विकास कृती समीतीचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, सचिव डॉ. विलास मोरे, सदस्य चंद्रशेखर मुळावेकर यांनी प्रहार जनशक्ती चे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांचे मार्फत जलसंपदा राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांना  निवेदन देऊन निम्न दुधना प्रकल्पाचे अर्धवट कामे पुर्ण करणे व संपूर्ण सेलू तालूका ओलीताखाली आणण्यासाठी जवळा  देवगावफाटा, बोरकीनी या भागासठी एक तर रवळगांव, देऊळगाव गात ,गुगळी धामणगाव या भागासाठी दुसरा कालवा निर्मिती साठी विनंती करुन पाठपुरावा केला होता.
याबाबत जलसंपदा विभागाला आराखडा सादर कलण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी दिले आहेत. अशी माहिती प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष शिवलींग बोधने यांनी दिली आहे. दरम्यान सेलू तालुका सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होईल अशी अशा तालुकावासीयांना लागली आहे.

□ या निवेदनात उजवा व डावा कालव्याचे अर्धवट कामे पुर्ण करून पुर्ण क्षमतेने पाणी वाटप करावे याशिवाय संपूर्ण सेलू तालुका ओलीताखाली येण्यासाठी देवगांवफाटा, जवळा नागठाणा, चिकलठाणा, खैरी निरवाडी, रायपूर, वालूर या भागासाठी एक कालवा आणि रवळगांव, देऊळगाव गात, डासाळा, खवणे पिपरी, लाडनांदरा, गुगळी धामणगांव या भागासाठी दुसरा कालवा निम्न दुधना प्रकल्पातून काढावा अशी मागणी केली आहे.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.