Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश दरम्यान धावेल ‘ही’ साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन, ‘या’ शहरातून सुरू करणार प्रवास

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांची सोय पाहता रेल्वेने महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश राज्यादरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन पूर्णतः आरक्षित असून, नांदेड ते आंब अंदौरा दरम्यान धावणार आहे. ट्रेन क्रमांक 05427/05428 खालीलप्रमाणे चालवली जाईल:-

या तारखेपासून साप्ताहिक ट्रेन सुरू होईल…

उत्तर पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 05427 नांदेड-अंब अंदौरा साप्ताहिक विशेष ट्रेन नांदेड येथून दर मंगळवारी 03 ऑगस्ट पासून सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 05.50 वाजता अंब अंदौरा येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने, 05428 अंब अंदौरा – नांदेड साप्ताहिक विशेष 05 ऑगस्ट पासून दर गुरुवारी दुपारी 03.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09.40 वाजता नांदेडला पोहोचेल.

या ठिकाणी ट्रेन थांबेल…

एसी, स्लीपर आणि सामान्य वर्गाच्या डब्यांसह ही विशेष ट्रेन पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, बीना, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी, मथुरा, नवी दिल्ली, पानिपत, अंबाला कॅन्ट, चंदीगड, साहिबजादा अजितसिंग नगर, मोरिंडा, रूपनगर, आनंदपूर साहिब, नांगलदाम आणि उना हिमाचल स्थानकांवर थांबतील.

या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना उत्तर भारतात प्रवास करण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रवाशी या निर्णयाचे स्वागत करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments are closed.