Take a fresh look at your lifestyle.

अबब…सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर होतोय अक्षरश: पैशांचा पाऊस, जाणून घ्या कोणी किती रुपये बक्षीस दिले!

Tokyo Olympic: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत देशाची सुवर्णपदकाची 13 वर्षांची प्रतीक्षा संपवली. त्याच्या या यशाने देशभरात आनंदोत्सव सुरू असून, देशभरातील जनता त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. तसेच अनेक मोठ्या नामांकित व्यक्ती आणि संस्थांनी नीरजला बक्षिस जाहीर केलं आहे. यामध्ये नेक राज्यांचे सरकार, केंद्र सरकार, बीसीसीआय आणि इतर संस्थांचा समावेश आहे.

हरियाणा सरकार कडून 6 कोटी आणि क्लास वन दर्जाची सरकारी नोकरी

पहिल्यांदा नीरज चोप्रा रहिवाशी असलेले राज्य हरियाणाने मोठे बक्षीस जाहीर केले. हरियाणा सरकारने नीरज चोप्राला तब्बल 6 कोटी रुपयांचे रोख बक्षिस व क्लास वन दर्जाची नोकरी देण्याचे जाहीर केले. तसेच पंचकुला येथे बनत असलेल्या अथेलेटिक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचे अध्यक्ष बनवण्याचे जाहीर केलं. ही माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली.

पंजाब सरकारकडून 2 कोटी

हरियाणाचे शेजारी राज्य  पंजाबने देखील नीरज चोप्राला बक्षिस जाहीर केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सरकारकडून नीरज चोप्राला बक्षिस म्हणून 2 कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

माणिपूर सरकारकडून 1 कोटी

पंजाब आणि हरियाणा पाठोपाठ माणिपूर सरकारनेही नीरज चोप्राला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआय कडून 1 कोटी

बीसीसीआय ने ऑलिंपिक मध्ये पदक जिंकलेल्या सर्व खेळाडूंना बक्षिस जाहीर केले आहे. बीसीसीआयने सुवर्णपदक विजेत्या नीरजला एक कोटी आणि रौप्यपदक  विजेत्यांना 50 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 25 लाख देणार असून, हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले.  बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली.

CSK ने जाहीर केले रोख बक्षिस

बीसीसीआयनंतर आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स या संघाने देखील नीरज चोप्राला रोख एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी 8758 नंबरची विशेष जर्सी बनवणार असल्याची माहिती दिली.

आनंद महिंद्रा देणार XUV 700 ही कार

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरजला महिंद्र कंपनीची गाडी XUV 700 देण्याची घोषणा केली.

बायजुजने ही जाहीर केले 2 कोटींचे बक्षिस

ऑनलाईन शिक्षण देणारी कंपनी बायजूजने देखील नीरजला बक्षिस म्हणून दोन कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या इतर खेळाडूंना देखील बायजूज रोख रक्कम म्हणून 1 कोटी रुपये बक्षिस देणार आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका