Take a fresh look at your lifestyle.

नवाब मलिकांवरील कारवाई मागे घ्या…

भाजपा विरूद्ध सेलूत निदर्शने महाविकास आघाडीचे प्रशासनाला निवेदन

सेलू :- परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ईडीने सूडबुद्धीने केलीली कारवाई तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी करीत सेलू तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात शुक्रवारी ता.२५ फेब्रुवारी रोजी ‘भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद’ ची जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा तीव्र निषेध दर्शविला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, तालुकाध्यक्ष माऊली ताठे, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे, शहराध्यक्ष रघुनाथ बागल आदींच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता पाथरी- जिंतूर कॉर्नर पासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ‘भाजप मुर्दाबाद’ चे फलक घेऊन ‘ भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद’ ची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या वेळी तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देण्यात आले. नवाब मलिक हे, महाविकास आघाडी सरकार मधील महत्वपूर्ण नेतृत्व असून ते अल्पसंख्याक व औकाफ विकास मंत्री आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी आजपर्यंत भाजपाचे अनेक वाईट कृत्य जनतेसमोर आणल्याने, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार महाविकास आघाडीच्या विरोधात, ईडीला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून राज्य सरकारवर दबाव टाकत आहे.
परंतु जनतेला हे सर्व माहीत आहे. महाविकास आघाडी पक्ष्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मा.ना.श्री. नवाब मलिक साहेब यांच्या पाठीशी आहोत ईडी व केंद्र सरकारचा या निवेदनाद्वारे जाहीर निषेध करत आहोत. मलिकांवर दाखल केलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रघुनाथ बागल, आनंद डोईफोडे, माऊली ताठे, निर्मला लिपणे, सुधाकर रोकडे, नबाजी खेडेकर, ॲड.बालासाहेब रोडगे, अजय डासाळकर, चंद्रकांत गाडेकर, विशाल देशमूख, रामेश्वर गाडेकर, गौस लाला, दिलीप आकात, अनिल डंबाळे, बाबासाहेब भदर्गे, मजिदभाई बागवान, मुजफ्फर भाई, परवेज सौदागर, आप्पासाहेब रोडगे, रहिम पठाण, अजिम कादरी, अंकूश सोळंके, आबा नायबळ, शिवराम कदम, गोटू धापसे, विष्णू बागल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

 डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.