सेलू (डाॅ विलास मोरे) : नटराज डान्स अकॅडमीच्या वतीने गोकुळ अष्टमी निमित्त घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
नृत्य स्पर्धेसाठी संगीत विशारद गंगाधर कान्हेकर, कांचन बाहेती, गटशिक्षणाधिकारी अधिकारी गणराज येरमळ यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धकांना संबोधित करताना श्री कान्हेकर म्हणाले की कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे शहरातील कलावंत घरात बसून होते. कलावंत सतत स्पर्धेत राहीला तरच त्याच्यात नवीन उर्जा गतीमान राहते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बालाजी सिरसाठ व मेघा काला यांनी काम पाहिले.
नगराध्यक्ष विनोद बोराडे, जोगदंड हॉस्पिटल सेलू, डेलिशियस कॉफी शॉप सेलू, युनिक क्रियेशन सेलू. गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, न्यू उत्तमराव शंकरराव सराफ सेलू, रीनाज अमेजिंग पार्लर, शुभमंगल क्लॉथ अँड साडी सेंटर यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली. यात चौदा वर्षा खालील गटात जान्हवी शर्मा व आरव टिकायक यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय कु प्रेक्षा तमशेटे व श्वेता गडदे, तृतीय जान्हवी बेटकर आणि माही सराफ. तर चतुर्थ क्रमांक सृष्टी सोलापुरे आरती नलावडे.
15 वर्षा वरील गटात दिक्षा सुखणानी हीने प्रथम क्रमांक मिळविला, द्वितीय पूजा चव्हाण, तृतीय शिल्पा बरडे आणि साक्षी राऊत तर चौथे बक्षीस माधुरी टाके आणि कल्याणी गेना यांनी पटकावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी बाहेती हीने केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कु.पल्लवी मुंडिक, कु.ऋतुजा काबरा, कु सुप्रिया गंधम यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.