Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या लसीपेक्षा अनुनासिक स्प्रे अधिक प्रभावी असण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर माहिती

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभारत मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही संसर्ग होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. मात्र, चिंता करण्याची जास्त गरज नसल्यकचे सध्या चित्र निर्माण होत आहे. कारण कोरोना लसीपेक्षा जास्त प्रभावी अनुनासिक स्प्रे लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज केवळ रक्तात बनत आहेत 

जोधपूरस्थित ICMR चे संचालक डॉ.अरुण शर्मा यांनी सांगितले कि,  भारतात लसीचे दोन्ही डोस घेऊन सुद्धा लोकांना कोरोना संसर्ग होत आहे कारण, या लसीमुळे ज्या अँटीबॉडीज बनत आहेत त्या फक्त रक्तात बनत आहेत, म्हणून लस  तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा विषाणू सुद्धा रक्तांमध्ये पोहोचेल.

डॉक्टर शर्मा पुढे म्हणाले, आता हा प्रश्न आहे कि विषाणू रक्तात कधी पोहोचलेला? रक्तात पोहोचण्यासाठी त्याला अगोदर श्वसनसंस्था पार करावी लागेल.  कोविडचा विषाणू आधी संक्रमित हवेद्वारे नाकापर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर तो श्वासनलिकेद्वारे रुग्णाच्या फुफ्फुसात पोहोचतो. यानंतर, व्हायरस श्वसनमार्गामध्ये राहत असताना त्याची संख्या वाढवू शकतो. हेच लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याचे मुख्य कारण आहे.

या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे नाकाद्वारे दिली जाणारी अनुनासिक स्प्रे अधिक प्रभावी असू शकते कारण अनुनासिक लस नाकातील श्लेष्मल त्वचेचे संरक्षण करेल. पोलिओसाठी जसे ओरल ड्रॉप दिले जाते त्याच प्रकारे अनाऊनासिक स्प्रे चा वापर करता येईल. म्हणूनच तज्ञांचा विश्वास आहे की नाकातून संसर्ग टाळण्यासाठी कोविड-अनुरूप वर्तन स्वीकारणे फार महत्वाचे आहे. जर आपण नाकाद्वारे स्प्रे दिला तर श्वसननलिकेतच विषाणू नष्ट होऊ शकतो.

Comments are closed.