नवी दिल्ली: कोरोनाला रोखण्यसाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 52 कोटी पेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, आणखी एक चांगली बातमी येत आहे. आता नाकाद्वारे (अनुनासिक) देण्यात येणारी कोविड लस लवकरच भारतात उपलब्ध होऊ शकते. भारत बायोटेक निर्मिती नाकाद्वारे देण्यात येणार्या कोविड लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या दूसर्या आणि तिसर्या फेरीला केंद्राकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती दिली.
भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोविड-19 साठी पहिल्या अनुनासिक लसीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी नियामक मान्यता मिळाली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने (Department of Bio-Technology) शुक्रवारी ही माहिती दिली.
क्लिनिकल चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण
क्लिनिकल चाचणी पहिला टप्पा 18 वर्षे ते 60 वर्षे वयोगटात पूर्ण झाला असल्याची माहिती डीबीटीने (Department of Bio-Technology) दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी नियामक मान्यता मिळणारी भारत बायोटेकची अनुनासिक (इंट्रॅनासल) लस ही पहिली अनुनासिक लस आहे.
लसीचे नाव सध्या BBV154 आहे
भारतातील मानवांवर क्लिनिकल चाचणी करणारी ही पहिलीच कोविड लस आहे. ही BBV154 लस आहे, ज्याचे तंत्रज्ञान सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून भारत बायोटेकने विकत घेतले आहे. मंत्रालयाने सांगितले की इंट्रानासल लस सुरक्षित, रोगप्रतिकारक आणि प्रीक्लिनिकल टॉक्सिटी स्टडीजमध्ये चांगली सहन होण्यासारखी असल्याचे आढळली आहे.
‘मिशन कोविड सुरक्षा’ च्या माध्यमातून विभाग सुरक्षित आणि प्रभावी कोरोनाविरोधी लसींच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. भारत बायोटेकची BBV154 कोविडलस ही देशातील पहिली इंट्रानासल (अनुनासिक) लस आहे जी क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात प्रवेश करत आहे.” अशी माहिती DBTच्या सचिव डॉ रेणू स्वरूप यांनी दिली.
Comments are closed.