Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…उद्धव ठाकरे नंतर नारायण राणे यांनी साधला संजय राऊत यांच्यावर निशाणा; केले धक्कादायक वक्तव्य

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये सुरू असलेली कुरघोडी संपताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नारायण राणे यांना नाशिक जिल्ह्यातून अटक झाली होती. त्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केला. जामिन मंजूर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पुन्हा भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला.

संजय राऊत शिवसेनेला अस्तास नेत आहेत

जनआशिर्वाद यात्रेदरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर हल्ला चढवला आणि ते दोघेही त्यांच्या पक्षाला संपवण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. राणे म्हणाले, ‘संजय राऊत काहीही अर्थहीन बोलतात. विनायक राऊत  आणि संजय राऊत हे शिवसेनेला अस्तास नेत आहेत.’ नारायण राणे रत्नागिरी येथील सभेत बोलत होते.

मला घाबरवण्यासाठी माझ्यावर कारवाई केली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थापड मारण्याशी संबंधित कथित वक्तव्याबद्दल अनेक शिवसेना नेत्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या विषयावर नारायण राणे बोलत होते.  रत्नागिरीतील जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, “माझ्या घरासमोर आलेल्या शिवसैनिकांचे पोलिसांनी आपल्या पद्धतीने स्वागत केले. शिवसेनेने गेल्या दोन वर्षात कोकण विभागाला काय दिले? त्यांना वाटले की जर त्यांनी माझ्यावर कारवाई केली तर मी घाबरून जाईल, पण आमची जनआशिर्वाद यात्रा यशस्वी झाली.”

शिवसेना सत्तेत असल्यामुळे त्यांनी मला अटक केली

राणे पुढे म्हणाले की त्यांनी काहीही चुकीचे केले नाही आणि शिवसेना सध्या सरकारमध्ये आहे, म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली.

‘मी काहीही चुकीचे केले नाही. ते (शिवसेना) सत्तेत आहेत, म्हणून त्यांनी मला अटक केली. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोना साथीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोणतेही काम केले नाही.’ असे ते म्हणाले. तसेच सुशांत सिंग (राजपूत) याचा खून झाला. दिशा सलियनचा बलात्कार आणि खून झाला, तरीही गुन्हेगार मुक्तपणे फिरत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

23 ऑगस्ट पासून सुरू झाला वाद

23 ऑगस्टला राणें यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या कथित वक्तव्यानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला. रायगड जिल्ह्यातील ‘जन आशीर्वाद यात्रे’ दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विसरले असल्याचा दावा करत या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते.

Comments are closed.