Take a fresh look at your lifestyle.

निळवंडे धरणातून 10 हजार क्युसेकचा विसर्ग

नगर : जरा धरण भरल्यानंतर अवघ्या बारा तासात निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले असून आज निळवंडे धरणातून प्रवरा नदीत दहा हजार क्युसेक चा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन केले जात आहे. निळवंडे तून जाणारे पाणी आता थेट जायकवाडीत जमा होईल.

अहमदनगर उत्तर जिल्ह्यात मुळा, भंडारदरा आणि निळवंडे हे प्रमुख धरणे आहेत. अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात होणाऱ्या जोरदार पावसावर हे तिन्ही धरणे अवलंबून आहेत. यंदा या भागात फारसा पाऊस झाला नव्हता त्यामुळे तिन्ही धरणे गेली नव्हती. भंडारदरा दर वर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने भरले आहे. काल दुपारी भंडारदरा भरून त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर भंडारदरा खाली असलेले निळवंडे धरण अवघ्या बारा तासात ओव्हरफ्लो झाले. या शिवाय पाणलोटात आजही जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे निळवंडे धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जात आहे आज सायंकाळी सहा वाजता या धरणातून सुमारे दहा हजार क्रिशचा विसर्ग केला जात होता.

पाऊस असाच सुरू राहिला आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली तर निसर्गात वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. हरिश्चंद्रगड पट्ट्यात ही जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मुळा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर मुळा धरण हे लवकरच भरेल. मुळा आणि प्रवरा नदीतून जाणारे पाणी जायकवाडीत जाते. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून नही विसर्ग केला जात आहे. त्यामुळे आता जायकवाडी तेही पाणीपातळी झपाट्याने वाढणारं असल्याचे स्पष्ट झाले आहे. उशिराने का होईना उत्तरेतील धरणांमध्ये भरमसाठ पाणीसाठा झाल्यामुळे लाभ क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.