पावने तीनशे गावांत 81 हजार शेतकऱ्यांना फटका 50 कोटीची केलीय मदतीसाठी मागणी
नगर जिल्ह्यात पुर, अतीवृष्टीमुळे आतापर्यत सुमारे 65 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपातील पिकांचे 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून ही बाब स्पष्ट झाली. 273 गावांतील 81 हजार 800 शेतकऱ्यांना हा फटका असुन मदतीसाठी 50 कोटी 80 लाखाची सरकारकडे मागणी केली आहे.
नगर जिल्ह्यात यंदा खरिपाच्या हंगामात सतत अतीवृष्टी, पाऊस व अन्य कारणाने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेबर आणि आक्टोबर या दोन महिन्यात जिल्ह्यामधील शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यात पुर, अतीवृष्टी व पावसाने नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या तर जमीन अक्षरशः जमीनी खरडून गेल्या, घरांत पाणी शिरुन संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मात्र दोन महिने उलटले तरी अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. कोकणात दिलेल्या मदतीनुसार या भागातही भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. नगर जिल्ह्यातील नेत्यांनाही एनडीआरएफ नुसार मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे वारंवार सांगितले असले तरी त्याबाबत कोणताही निर्णय़ झाला नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने पुर्वीच्या निकषानुसार जिरायती भागासाठी हेक्टरी 6800, बागायती क्षेत्रासाठी 13500 व फळबागांसाठी 18 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यासाठी 50 कोटी रुपये मदत मिळावी यासाठीचा सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. नुकसानीची भरपाई कधी मिळणार याकडे मात्र शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
टक्केवारी कशी ठरते
अतीवृष्टी, पुर, जास्तीचा पाऊस या कारणाने झालेल्या नुकसानीचे कृषी, महसुल विभागाकडून पंचनामे केले जातात. 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती, बागायती व फळबागा अशा वेगवेगळ्या निकषामुसार भरपाई दिली जाते. मात्र नुकसानीची टक्केवारी कशी ठरते हे मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सांगता येईना. शिवाय 33 टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्यांना भरपाई दिली जात नाहीच, पण 33 टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्याची कृषी विभागाकडे साधी नोंदही केली जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून हा विषय चर्चेत आहे. 33 टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणे गरजेचे आहे त्यावर नेते, अधिकारी यावर कोणीच बोलत नाही असे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. झालेल्या नुकसानीपेक्षा 33 टक्क्यापेक्षा कमी नुकसानीचा आकडे अधिक असून शकतो असे त्यांनी सांगितले.
नुकसानीची आकडेवारी
– गावे ः 273
– शेतकरी संख्या ः 81 हजार 780
– जिरायती क्षेत्र ः 53,533 (हेक्टर)
– बागायती ः 7075 (हेक्टर)
– फळबाग ः 255 (हेक्टर)
– जमीन खरडून गेली ः 306 हेक्टर
– एकून ः 65155
– मागणी केलेली रक्कम ः 50 कोटी 89 लाख
Comments are closed.