सेलू (डाॅ विलास मोरे) :- सेलु नगर पालिकेतील कर्मचारी व कामगारांचा आपल्या विविध मागण्यासाठी अनेक निवेदने दिली. परंतू पालिका प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी सोमवारी ता. २० ऑक्टोबर रोजी थेट तहसीलवर धडक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
सेलू नगर पालिकेचे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २२ ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन करत आहेत. सोमवार २५ ऑक्टोबर हा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. कामगार युनियन लाल भावट्याचे सरचिटणीस काॅ राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील टिळक पुतळ्यापासून स्टेशन रोड, बसस्टॅन्ड समोरुन तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार दिनेश झांपले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात कर्मचार्यांच्या पगारातून कपात झालेले बँक सोसायटीचे २२ हप्ते व्याजा सहीत भरावेत, कोरोना काळात कपात केलेली आर्धी पगार तात्काळ देण्यात यावी, ज्या कर्मचार्याच्या बँक खाते बेबाकी आहे त्या कर्मचार्ंयाची रक्कम परत देण्यात यावी, सातवा वेतन आयोगाचे दोन हप्ते तात्काळ देण्यात यावे आणि थकीत महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा, चालू महागाई भत्ता ११ टक्के पगारामध्ये समाविष्ट करावा, फेस्टिवेल रक्कम पूर्ण द्यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन बेमुदत सुरुच राहणार आहे. अशी माहिती आंदोलनच्या संयोजकांनी दिली.
Comments are closed.