Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची चप्पल, दगड फेक; सुप्रिया सुळे चर्चेला तयार पण

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारने अमान्य केल्याने आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धडक दिली आहे. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल व दगड फेक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  सटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी निवासस्थान परिसरात घुसले.

दरम्यान, भाजपचे विविध नेते आणि वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीमुळेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आंदोलन केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. त्यामुळे नाईलाजाने सुप्रिया सुळे या सिल्वर ओक निवासस्थानात परतल्या.

Comments are closed.