Take a fresh look at your lifestyle.

प्रेमी युगुलांच्या अश्लील कृत्याने त्रस्त झालेल्या मुंबईतील सोसायटीने घेतला धक्कादायक निर्णय, ऐकून विश्वास बसणार नाही

मुंबई: काही प्रेमी युगुल ‘प्यार  तो डरना क्या?’ व ‘प्रेम करूया खुल्लमखुल्ला’ या गोष्टींना फार गंभीरपणे घेतलायचे दिसते. बाटरेच प्रेमी जागा मिळेल तिथे सुरू होतात. यात एकमेकांना मिठी मारणे, एकमेकांचे चुंबन घेणे किंवा त्याहूनही जास्त आपत्तीजनक वागणूक करत असतात. त्यांना न जागेचे भान असते न आजुबाजूंच्या लोकांचे. अशाच प्रेमीयुगुलांच्या वागण्याला कंटाळून मुंबईतील एका सोसायटीने धक्कादायक निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत तुम्ही ‘नो स्मोकिंग’, ‘नो पार्किंग, किंवा ‘नो लिटरिंग’ असे सूचना फलक पहिले असतील. परंतु ‘नो किसिंग झोन’ असलेला फलक पाहिला नसेल. मात्र हे खरे आहे. मुंबईतील ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सोसायटीने आपल्या गेटच्या समोर हा फलक लावला आहे.

काय आहे प्रकरण?

सोसायटीमध्ये राहणारे जोडपे करण आणि रुचि यांनी पहिल्यांदा सोसायटीच्या बाजूच्या रस्त्यावर एका प्रेमी युगुलाला आपत्तीजनक अश्लील चाळे करताना पाहिले . त्यांनी या घटनेचा विडिओ बनवत स्थानिक नगरसेवकाला पाठवला. त्यावर नगरसेवकाने हा विडिओ पोलिसांना द्यायला सांगितले. परंतु करण आणि रुचिला पोलिसांकडूनही काही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे सोसायटीमधील सदस्यांनी आपसात चर्चा करून गेट समोर ‘नो किसिंग झोन’ चा फलक लावण्याचा निर्णय घेतला.

या सोसायटीत राहणार्‍या लोकांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेक प्रेमी युगुल या भागात येऊ लागले. ते येथे कार, दुचाकीने यायचे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत राहायचे. यामुळे सोसायटीमध्ये राहणार्‍या त्रास व्हायचा. त्यांच्या मते, आता हे साइन बोर्ड लावल्यानंतर जोडप्यांची संख्या कमी झाली आहे. आता ते फक्त सेल्फी घेण्यासाठी इथे येतात.

सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विनय अन्सूरकर म्हणतात, ‘आम्ही जोडप्यांच्या विरोधात नाही, पण त्यांच्याकडून करण्यात येणार्‍या कृत्यांच्या विरोधात आहोत. हे आमच्या घरासमोर घडत होते. अनेक लहान मुले आणि बुजुर्ग व्यक्ती इथे  राहतात.त्यामुळे आम्हाला तो फलक लावावा लागला. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे हा IPC च्या काही कलमांखाली गुन्हा आहे.”

Comments are closed.