Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे… दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना सेक्स रॅकेटमध्ये झाली अटक, 2 तासाचे घ्यायचे तब्बल ‘एवढे’ रुपये

मुंबई:  मनोरंजन विश्वातील कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी आणि प्रेम पाहून सामानी माणसांना त्यांचा हेवा वाटतो. मात्र , हे विश्व दिसते तेवढे चांगले नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. वेळोवेळी मनोरंजन विश्वातील काळे कारनामे आता उघडकीस येत आहेत. अलीकडेच वेबसिरिज मध्ये काम देण्याच्या बहाण्याने नवख्या मॉडेल्सना अश्लील चित्रपटात गुंतवल्याच्या बातम्या समोर आल्यात. या प्रकरणी बॉलीवुड मधील मोठी नावे सहभागी असल्याचे देखील सिद्ध झाले.

2 प्रसिद्ध अभिनेत्रींची सेक्स रॅकेट मधून सुटका

शिल्पा शेट्टीचे पती  उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीशी थेट संबंध असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर  आता मुंबई गुन्हे शाखेने जुहू येथील हॉटेलमधून सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. गुन्हे शाखेने जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधून मुंबईतील एक टॉप मॉडेल आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणाला तपास पथकाने अटक न दाखवता आणि त्यास बचाव (Rescue) म्हटले. तपास पथकाने ईशा खान नावाच्या महिलेला अटक केली आहे, महिलेवर सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रचला सापळा

ईशा खान बऱ्याच काळापासून मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याची मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने एक टीम तयार केली आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने बनावट ग्राहक बनून प्रथम ईशा खानशी संपर्क साधला. यानंतर ईशाने अनेक फोटो पाठवले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दोन मुलींचे फोटो निवडले. त्यापैकी एक अनेक जाहिरातींमध्ये काम करते आणि दुसरीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

2 तासाचे 2 लाख रुपये

प्राप्त माहितीनुसार, ईशा खानने प्रत्येक मुलगी दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेईल असे सांगितले होते. त्या दोन लाख पैकी 50 हजार ईशा खानला मिळणार होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या तिघांना जुहू येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले. गुरुवारी रात्री ईशा खान, मॉडेल आणि अभिनेत्री त्या हॉटेलच्या बाहेर पोहोचताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली.

लॉकडाऊनमुळे गेले काम त्यामुळे या व्यवसायात उतरावे लागले

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्रीने सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून काम उपलब्ध नाही. ती करत असलेली मालिका देखील लॉकडाऊनमुळे बंद आहे. अशा परिस्थितीत मुंबईत राहण्यासाठी पैशांची गरज होती. म्हणूनच ती या व्यवसायात आली असल्याचे तिने सांगितले.

पोलिस पुढील तपास करत असून, या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर येऊ शकतील असा अंदाज आहे.

Comments are closed.