Take a fresh look at your lifestyle.

राज कुंद्राला जामीन मिळाला तर करू शकतो ‘हे’ कांड, म्हणून मुंबई पोलिसांची जामीन मंजूर न करण्याची मागणी

मुंबई: पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. कोर्टात या सुनावणीदरम्यान मंगळवारी मुंबई पोलिसांनी त्याच्या याचिकेला विरोध केला असून, पोलिसांनी म्हटले की, जर राज कुंद्राला जामीन मिळाला तर तो नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारखा देश सोडून पळून जाऊ शकतो. अशी भीती आहे. राज कुंद्राकडे ब्रिटनची नागरिकता असल्यामुळे पोलिसांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाला न्यायालयात विरोध करत म्हटले की, जर त्याला जामीन मिळाला तर तो समाजात चुकीचा संदेश जाईल. तसेच तो पुन्हा असा गुन्हा करेल याची शक्यता नाकारता येत नाही. राज कुंद्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, पोलिसांनी एप्रिलमध्ये या प्रकरणात आरोपपत्र सादर केले होते. त्यावेळी त्याचे नाव ना आरोपपत्रात होते ना एफआयआरमध्ये. आरोपपत्रात नाव असलेले आरोपी जामिनावर बाहेर असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

संपूर्ण आदेश गृहितकावर आधारित असून तो रद्द करण्यात यावा. अर्जदाराचा कथित गुन्ह्यात सहभाग दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा नाही हे दंडाधिकाऱ्यांला समजण्यात अपयश आले आहे. असेही राज कुंद्राच्या याचिकेत नमूद केले आहे.  या याचिकेला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. बनवलेले सर्व व्हिडीओ कुठे अपलोड केले गेले या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे की जर आरोपीला जामीन मंजूर झाला तर तो असे आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणे सुरू ठेवत आपला गुन्हा करत राहू शकतो. या गोष्टीचा आपल्या संस्कृतीवर परिणाम होईल आणि समाजात चुकीचा संदेश जाईल. राज कुंद्राचा या प्रकरणातील मुखी आरोपी प्रदीप बक्षीसोबत संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. राजने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. जर राज कुंद्राला जामीन मिळाला, तर तो ब्रिटिश नागरिक असल्यामुळे देश सोडून पळून जाऊ शकतो.

Comments are closed.