Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी मुंबई सज्ज, बनवली ‘ही’ खास योजना

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी मुंबई सज्ज, बनवली ‘ही’ खास योजना

मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट कमकुवत झाली असली तरी तज्ज्ञ सातत्याने तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत आहेत. तिसऱ्या लाटेच्या भीती दरम्यान, ऑब्झर्व्हर अँड रिसर्च फाउंडेशन (ORF) ने आपल्या अहवालात मुंबईत लसीकरण गती वाढवण्याची आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याची आणि महानगरीय क्षेत्रातील नियोजित ‘अनलॉक’ करण्यासाठी शिफारस केली आहे.

‘मुंबई प्लस’ प्लॅन…

या अहवालात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील अतिशय महत्वाचे तपशील सांगण्यात आले आहेत. त्यात ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा आणि लसीकरणाच्या समस्यांचा तपशील आहे. या अहवालात लसीकरणाचे नियोजन, सार्वजनिक वाहतूक उघडणे आणि क्षेत्राचे नियोजनबद्ध अनलॉकिंग करण्यासाठी ‘मुंबई प्लस’ दृष्टिकोनाची शिफारस करण्यात आली आहे.

ओआरएफने सांगितले की महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आणि मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि राज्यातील इतर शहरी भागात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला नियंत्रित करण्यासाठी शक्य असतील तेवढे प्रयत्न करण्याचे आदेश दिले.

सध्या मुंबईतील कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होतान दिसत आहेत. परंतु मुंबईमध्ये अजूनही लेवल 3 चे निर्बंध सुरू आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये कधी निर्बंध शिथिल होतील हा प्रश्न सर्वांना पडत आहे. यावर बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकांनी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, येणारया आठवड्यात याबाबत महानगरपालिका चर्चा करून ठोस निर्णय घेणर आहे.

Comments are closed.