Take a fresh look at your lifestyle.

अतिशय संतापजनक: ‘या’ क्षुल्लक कारणासाठी आईने केली साडे तीन वर्षाच्या मुलाची हत्या, नंतर केली आत्महत्या

नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका महिलेने कथितरित्या आपल्या मुलाचा गळा दाबून खून केला आहे. मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने ही महिला नाराज होती. आपल्या मुलाची कथित हत्या केल्यानंतर, महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त केल्याची माहिती दिली आहे.

मुलगा अवघा साडे तीन वर्षाचा होता…

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाला ऑनलाईन अभ्यास न केल्याबद्दल त्याची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. मुलाच्या हत्येनंतर तीने स्वतःचेही जीवन संपवले. घटनेच्या वेळी महिलेचे आई -वडीलही घरी उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे.

चिठ्ठीमध्ये कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले…

पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीनुसार, त्यांच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. असे चिठ्ठीत लिहिले असल्याचे समजते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत मुलीने केला आईचा खून…

काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये मुलीसोबत अभ्यासावरून भांडण करणार्‍या आईचा मुलीने कराटे बेल्टने गळा घोटून खून केला होता. नवी मुंबईत अभ्यासावरून झालेल्या भांडणानंतर 15 वर्षीय मुलीने तिच्या आईचा कराटे बेल्टने गळा घोटून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की नंतर मुलीने या घटनेस अपघाती मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. ही घटना 30 जुलै रोजी नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडली. मुलगी आणि तिच्या आई यांच्यात अभ्यासावरून सतत भांडणे व्हायची. मृत महिलेची मुलीने वैद्यकीय अभ्यासक्रम घ्यावा अशी इच्छा होती परंतु मुलगी हे करण्यास नकार देत होती. अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्यातील एका दिली.

Comments are closed.