नवी दिल्ली: गोंधळ आणि निदर्शनांच्या दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन अचानक संपवण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सरकारच्या सात मंत्र्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी या मुद्द्यावर माफी मागावी असे सांगितले.त्यांनी अराजकता पसरवणे हाच विरोधी पक्षाचा अजेंडा असल्याचे म्हटले.
महिल खासदारांसोबत झालेल्या कथित धक्का-बुक्कीवर दिले उत्तर
राहुल प्रकरणात सरकारची बाजू ठेवत सरकार मधील मंत्र्यांनी सांगितले की “आम्ही त्यांच्याशी रोज बोलण्याचा प्रयत्न केला.”
राहुल गांधींसह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी महिला खासदारांवर हल्ल्याच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्षाचे नेते आज संसद संकुलाबाहेर जमले होते आणि पावसाळी अधिवेशन अचानक संपल्याच्या विरोधात निदर्शने केली होती. महिला खासदारांसोबत झालेल्या कथित धक्का-बुक्कीचे आरोप त्यांनी फेटाळले.
अराजकता निर्माण करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा
तसेच सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास झाला असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “पावसाळी अधिवेशनात रस्त्यावरून संसदेपर्यंत अराजकता निर्माण करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा होता.” जे काही झाले ते लज्जास्पद असून, राज्यसभेत सरचिटणीसांचे टेबल नाचण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी नसल्याचे ते म्हणाले.
विरोधकांच्या गदारोळ/निदर्शनामुळे अधिवेशन लहान करावे
“विरोधी पक्षांनी नवीन मंत्र्यांचा परिचयही होऊ दिला नाही. 19 जुलै रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी संपणार होते, परंतु विरोधकांच्या गदारोळ/निदर्शनामुळे अधिवेशन लहान करावे लागले आणि बुधवारी संपवावे लागले हे विशेष.” असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.
Comments are closed.