Take a fresh look at your lifestyle.

सेलू तालुक्यात सर्वच कंपन्याचे नेटवर्क विस्कळीत बँकांचीही कनेक्टव्हीटी गायब ग्राहकांना नाहक त्रास

सेलू : मोबाईल कंपन्यांच्या विस्कळीत नेटवर्क सेवेमुळे मोबाईलधारक ग्राहकांसह बँक ग्राहकांना नाहक त्रस्त होत त्रास सहन करावा लागत आहे. कित्येकदा बँकेत चालान भरायला गेलेल्यांना नेटवर्क नसल्याचे सांगितले जाते. मोबाईलधारकही तासनतास कव्हरेजसाठी ताटकळत राहतात. काही ग्राहकांनी दुसऱ्या कंपनीत मोबाईलसेवा पोर्ट केले असले तरी समस्या कायमच असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. खासगी कंपनीच्या मोबाईल सेवेसह बीएसएनलची नेटवर्क सेवा नेहमीच डोकेदुखी ठरू लागली आहे.

मागील अनेक दिवसांपासून ग्राहकांना यांचा त्रास होत आहे. परिणामी ऑनलाईन व्यवहार करण्यावर मर्यादा येत आहेत. फोन न लागणे, इंटरनेट सेवा बंद पडणे, वारंवार कव्हरेज जाणे, फोन लावला तरी आवाज न येणे असे प्रकार घडत आहे. यामुळे काही ग्राहक त्या कंपनीची सेवा यापेक्षा बरी असे म्हणत सीम दुस-या कंपनीत पोर्ट करत आहेत. मात्र तिकडेही समाधान मात्र होताना दिसत नाही. मोबाईल सेवेतील या समस्येमुळे पतसंस्था, कॅफे सेंटर धारकांची डोकेदुखी वाढली आहे. मोबाईल कंपनी अनलिमिटेड डाटा फ्री या सेवेतून ग्राहक रिचार्ज करून पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. मोबाईल नेटवर काहींनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले. मात्र तासनतास कव्हरेज राहत नसल्याने सर्वाचेच नुकसान होत आहे. कव्हरेज नसल्याचा फटका बँकिंग व्यवसायाला बसतो. बँक ग्राहकांची ताटकळ होत त्यांना व्यवहार करता येत नाही. पण याची दखल मोबाईल नेटवर्क कंपन्या घेतांना दिसत नाही. शहरात टॉवर भरपूर असताना नेटवर्क का मिळत नाही असा प्रश्न नागरीक करत आहेत.
“मागील काही दिवसांपूर्वी मोबाईल कंपनीची कॉल नेटसाठी लागणाऱ्या रिचार्जवर ३० ते ४० टक्के वाढ केली. यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. दरवाढ करूनही ग्राहकांना मात्र त्रासदायक सुविधा पुरविल्या जात आहेत. परिणामी ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.”

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.