Take a fresh look at your lifestyle.

संतापजनक: वडिलांच्या मृत्यूनंतर रस्त्यावर राहण्यास मजबूर, 17 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यात एक अतिशय संतापजनक घटना समोर आली असून  पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका 17 वर्षीय अनाथ मुलीवर कथित सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपींनी या अगोदरसुद्धा नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 दरम्यान अनेक वेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

वडिलांचा मागच्या वर्षी झाला होता मृत्यू

पोलिस उपायुक्त (रेल्वे) प्रदीप जाधव यांनी सांगितले की, मुलीची आई कुटुंब सोडून गेली होती, त्यानंतर अल्पवयीन मुलगी  तिच्या वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहू लागली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यू झाला.  घरभाडे देऊ न शकल्याने  मुलीला घरमालकाने खोली रिकामी करण्यास सांगितले, त्यानंतर ती वसईतील फुटपाथवर राहू लागली.

पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता समोर आला भयंकर प्रकार

3 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या पथकाला मुलगी वसई रेल्वे स्टेशन परिसरात भटकत असल्याचे आढळले, जेव्हा तिला विचारण्यात आले की ती कुठे राहते? तेव्हा ती काहीच बोलली नाही आणि ती घाबरलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्याशी संवाद करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) आणि काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली.

आरोपींविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

डीसीपीने सांगितले की, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले, ज्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांची माहिती गोला केली. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली POCSO) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापुसाहेब बागल यांनी सांगितले की, “मुलगी घाबरलेली आहे. आम्ही समुपदेशकाची मदत घेत आहोत. मुलीचे पुनर्वसन केले जाईल आणि तिला व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाईल.”

 

Comments are closed.