Take a fresh look at your lifestyle.

मराठी बिग बॉस तिसरा सिझन संपला….महेश मांजरेकर यांचा तीन वर्षांचा करार संपला…!!

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक मालिका रसिकांच्या भेटीस येत असतात, त्यातून आपले नेहमीच खूप मनोरंजन होत असते. खूपसे लाईव्ह शो सुद्धा पडद्यावर पाहायला मिळतात, जे प्रेक्षकांना खूप आकर्षित करतात. त्यातीलच एक शो म्हणजे “बिग बॉस” होय. हा शो हिंदी मध्ये सुद्धा सक्रिय आहे आणि मराठी मध्ये सुद्धा. मराठी बिग बॉस देखील नेहमीच चर्चेत असतो, आता या शो चा तिसरा सिझन देखील संपला असुन यामध्ये विशाल निकम हा विजेता बनला आहे.

आता या बिग बॉसच्या आगामी सिझनची रसिक आतुरतेने वाट बघत आहेत, शिवाय पुढील सिझनचे सूत्रसंचालन पुन्हा महेश मांजरेकरांकडे येणार का..? असा प्रश्न अनेकांना असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. मात्र महेश मांजरेकर यांनी पिपिंगमुन मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतुन बिग बॉसच्या आगामी सिझन बद्दल आणि त्याच्या नव्या सुत्रसंचालकाबद्दल खास माहिती सांगितली आहे.

महेश मांजरेकर म्हणतात की “मला तीन वर्षे काम करताना मजा आली. पण माझा होस्ट करण्याचा तीन वर्षांचा करार होता आणि आता तो संपलाय. ही तीन वर्षे मला होस्टिंग करताना मजा आली. आता कोण होस्ट करतय ते बघुयात. म्हणजे तुमच्या बरोबर मी पण हा शो बघीन. अजून खूप लोक आहेत चांगलं सूत्रसंचालन करणारी. मला पुन्हा बोलवल तरी आनंद होईल आणि नाही बोलवल तरी. पण बिग बॉस मराठीच्या टीमने मला तीन वर्षे भरभरून साथ दिली आणि सपोर्ट केले.”

महेश मांजरेकर यांनी बिग बॉसचे सूत्रसंचालन उत्कृष्ट रित्या केले होते, त्यांचे सूत्रसंचालन आणि या शोमधील सर्व खेळाडू उत्तम होते. म्हणून तर हा शो फार कमी वेळात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला आहे. याच्या तीन वर्षांची जबाबदारी महेश मांजरेकर यांनी उत्तम रित्या स्वीकारली आणि पार पाडली आहे. हा शो अनेकदा तुफान चर्चेत आला होता आणि आताही याची चर्चा सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू असते.

या शोमध्ये नेहमीच खूप काही थक्क करून टाकणाऱ्या घटना घडल्या होत्या. या घटनांनी प्रेक्षकांना आणखीन उत्सुक केले होते, तसेच यामध्ये समाविष्ट असलेले अन्य कलाकार देखील रसिकांचे खूप मनोरंजन करत होते. त्यांचे, बोलणे, भांडणे, अगदी सहजपणे वावरणे अनेकांना आकर्षित करत होते. हा लाईव्ह शो अनेकांना टीव्ही समोर खिळवून ठेवणारा होता.

तसेच या शो चे सूत्रसंचालन सुद्धा खुपच सुंदर झाले, त्यामुळे हा शो पाहण्यासाठी आणखीन मजा येत होती. आता याचा नवा सिझन कधी भेटीस येणार याची अनेकजण वाट पाहत आहेत. शिवाय या नव्या सिझनचे सूत्रसंचालन आता कोण करणार याची देखील सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रहो तुम्हाला नव्या सिझनबद्दल काय वाटते ते कमेंट करून सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Comments are closed.