Take a fresh look at your lifestyle.

आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम

सेलू :- येथील मराठा सेवा संघाच्यावतीने सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलूच्या सभागृहात गुरुवार रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रामराव गायकवाड, अशोक कुंभार आणि आमदार उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश हिवाळे, माधव गव्हाणे, उमा पांडे, शेख मौजम शेख अब्दुल, राजू दयावरवार, पांडुरंग मांगदरे , शिवशंकर औसेकर , अन्सारी मो. अ. जुनेद मो. गोस यांचा तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अशोक पाठक यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात मेडिकल प्रवेशासाठीच्या निट परीक्षेत पाचशे पेक्षा अधिक गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थी शशांक हेलसकर , किरण काष्टे , शुभम इंगळे , परेश पाटवकर , लक्ष्मी साखरे , हर्षल शिंदे , शालीनी कांदळे , हर्षदा घुले , नेहा इक्कर , विशाखा घुले यांचा तर ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बाल कवी कट्ट्यात सहभागी होणारे विद्यार्थी आदर्श गाडेकर, सोहम उंडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव बोबडे हे होते. तर शरद मगर, कैलास कदम, सुरेखा आहेरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्जेराव लहाने यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी तर आभार प्रदर्शन रामराव मैफळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद ठाकर, चैतन्य खरात , सचिन विखे , पांडुरंग लाडाणे, ज्ञानेश्वर सोळंके, दिपक उकलकर यांनी पुढाकार घेतला.

पुर्ण….. डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.