Take a fresh look at your lifestyle.

मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या रागातून झाली हत्या, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

नागपुर: अनेकवेळा क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. क्षणभराच्या रागाने एकाचे जीवन समाप्त होते तर अनेकांचे आयुष्य उद्वस्थ होते. नागपूर मध्ये फ्रेंडशिपच्या डे च्या दिवशी एका व्यक्तीने महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. या गोष्टीचा राग आल्याने त्या महिलेच्या इतर मित्रांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार्‍या व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, हत्येत आणखी लोकांचा सहभाग असल्याच्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

प्राप्त महितीनुसार, वाद होण्याचे कारण , जागतिक मैत्रीदिनी एका पुरुषाने एका महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, ज्यामुळे महिलेच्या इतर संतप्त  मित्रांनी प्रथम त्या पुरुषाला मारहाण केली आणि धमकी दिली. मात्र, तीन दिवसांनंतर म्हणजेच बुधवारी, 4 ऑगस्ट रोजी पुन्हा वाद वाढला. या दरम्यान, त्या मुलांनी चाकूने त्या व्यक्तीचा खून केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळून गेले.

नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. नागपूर पोलिसांचे अतिरिक्त सीपी सुनील फुलारी यांनी सांगितले की, या खून प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे सुगावे मिळाले असून, आतापर्यंत संपूर्ण प्रकरणात 5 जणांची अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी केली जात आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत आणि या घटनेत आणखी किती लोकांचा सहभाग होता याचा तपास करत आहेत.

Comments are closed.