ठाणे: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या प्रेमिकेने लग्नासाठी त्याला नाकारल्यानंतर आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी युवकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक लाईव्हवर येत आत्महत्येची माहिती दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम मध्ये राहणार्या अंकुश पवार या तरुणाचे मागील 3 वर्षांपासून एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्या मुलीने त्याला नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या अंकुश पवार या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी लाईव येऊन दिली माहिती…
अंकुश एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करायचा. त्याने फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत आत्महत्येबद्दल माहिती दिली होती. त्याने फेसबुकलाईव दरम्यान सांगितले की, तो एका मुलीसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे, तो तिच्यावर खूप प्रेम करतो पण जेव्हा त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्या मुलीने त्याचा प्रस्ताव नाकारला. तसेच त्याने आतापर्यंत काम करून बचत केलेले पैसेही त्या मुलीला दिले असल्याचे सांगितले.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांमध्ये बर्याच वेळाअनेक मुद्द्यांवर भांडणे व्हायची आणि गुरुवारी त्यांच्या जोरदार वादावादी झाली. या दरम्यान त्या मुलीने त्याला कथितरित्या मरण्यास सांगितले, त्यानंतर त्याने संतापाच्या भरात आत्महत्या केली. एमएफसी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.