Take a fresh look at your lifestyle.

अभिमानास्पद! ‘या’ देशात महात्मा गांधींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा मांडण्यात आला ठराव , ऐकून थक्क व्हाल

स्वातंत्र्यादिनाच्या मंगल दिवशी आणखी एक खुशखबर समोर येत आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांच्या सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी संसदेत ठराव मांडण्यात आला.

मरणोत्तर सुवर्णपदक देण्याची मागणी

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका प्रभावशाली खासदाराने अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात महात्मा गांधींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यासाठी शुक्रवारी ठराव मांडला. या ठरावात शांती आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्याच्या कार्यासाठी गांधींना मरणोत्तर सुवर्णपदक देण्याची मागणी करण्यात आली. कॉंग्रेसनल गोल्ड मेडल (Congressional Gold Medal) हा अमेरिकेत देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

महिला खासदाराने केला ठराव

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात काँग्रेसच्या महिला खासदार कॅरोलिन बी. मालोनी म्हणाल्या की, “महात्मा गांधींच्या ऐतिहासिक सत्याग्रह चळवळीने एका राष्ट्रासह जगाला प्रेरणा दिली आहे. महात्मा गांधींनी आपल्या जीवनात अशी उदाहरणे सादर केली आहेत जी लोकांना इतरांची मदत करण्यासाठी आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात.”

हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय असतील

कॅरोलिन पुढे म्हणाल्या, “एक लोकसेवक म्हणून, मी दररोज महात्मा गांधींच्या धैर्याने आणि उदाहरणाने प्रेरित होती. महात्मा गांधींच्या कार्यांची उदाहरणे कोणत्याही विषम परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात.”

जर महात्मा गांधींना मरणोत्तर सुवर्णपदक देण्यात आले तर हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय असतील. याआधी अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान जॉर्ज वॉशिंग्टन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, मदर टेरेसा आणि रोझा पार्क्स सारख्या अनेक महान व्यक्तींना देण्यात आला आहे.

Comments are closed.