Take a fresh look at your lifestyle.

अरेरे…लग्न सोहळ्यांना परवानगी; तरीही लग्नाळू चिंतीत, कारण ऐकून धक्का बसेल

बीड: कोरोनाच्या दोन्ही लाटेत सर्वात जास्त फटका महाराष्ट्र राज्याला बसल आहे. कोरोना विषाणूमुळे प्रत्येक जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले. यामुळे छोट्या व्यावसायिकांबरोबरच मोठ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना पण त्याचा त्रास झाला. यातून मंगल कार्यालय देखील सुटले नाहीत. काही लोकांनी 50 जणांची परवानगी असतानाच आपली लग्न उरकून घेतली. काहींनी निर्बंध शिथिल झाल्यानंतर धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी लॉकडाउन शिथिल होण्याचची वाट पाहत होते.

मागील आठवड्यापासून राज्यात बऱ्याच कालावधीनंतर  थोडे निर्बंध शिथिल झाले आहेत. बीड जिल्ह्यात लग्नसमारंभासाठी 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु इथून पुढे 4 महिने मुहूर्त नाहीत म्हणून मंगल कार्यालय मालकांची तसेच लग्नाळू मुलांची पंचाईत झाली आहे.

लग्नसमारंभाशी निगडित व्यवसाय अडचणीत

ऑगस्ट महिन्यामध्ये लग्न समारंभासाठी मुहूर्त नाहीत मात्र 18,20, 21,25, 26, 27, 30 आणि 31 यासोबतच सप्टेंबर महिन्यातील 1,8, 16 व 17 या तारखेचे काही गौण मुहूर्त आहेत. म्हणजे पुढचे चार महिने लग्नासाठी चांगले  मुहूर्त नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांनी आपली लग्नसमारंभ पुढे ढकलली आहेत. लग्नसमारंभ होत नसल्याने या व्यवसयाशी निगडित बरेच कामगार बेरोजगार झाले आहेत, त्याचबरोबर इतर संलग्न व्यवसायांना पण याची झळ पोचत आहे. केटरिंग व्यवसाय करणारे आणि बग्गीवाले, बँडवाले यांचे देखील हाताला काम नसल्याने हाल होत आहेत.

सभा , मोर्चे मात्र तेजीत

एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध असताना निवडणुकीसाठीचे सभा, मोर्चे मात्र तेजीत चालू आहेत. तिथे गर्दी मोठ्या प्रमाणात होऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारकडून कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन 5 स्तरावर अनलॉक केले जात आहे. थोडे निर्बंध शिथिल झाले तेंव्हा काही लोकांनी कमी उपस्थितीमध्ये आपले लग्नसमारंभ उरकून घेतले.

चार महिन्यांनी मुहूर्त मात्र पुन्हा लॉकडाउनची भीती

सध्या तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे व्यावसायिकांची चिंता अजून वाढली आहे. त्यांना परिस्थिती पूर्वीसारखी बिकट होईल याची भीती वाटत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत इशार दिला आहे. ज्या दिवशी राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासेल त्या दिवशी पूर्ण राज्यात कडक लॉकडाउन लावण्यात येईल असे ते म्हणाले.

तसेच त्यांनी राजकीय आणि धार्मिक संघटनांना निर्बंध शिथिल झाल्याचा फायदा स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करू नका असे आवाहन केले. राजकीय सभा मोर्चे जर असेच  सुरू राहिले तर  कोरोंनाची तिसारी लात अपेक्षेपेक्षा लवकरच येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Comments are closed.