Take a fresh look at your lifestyle.

Sarkari Naukari 2021: महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात बंपर भरती; दोन हजारापेक्षा जास्त जागा, जाणून घ्या पूर्ण तपशील

मुंबई: कोरोना काळात राज्यातील लाखो लोकांनी रोजगार गमावला. सर्व क्षेत्रात हेच हाल होते. मात्र, आरोग्य विभागात रोजगार काही कमी  झाला नाही. उलट आरोग्य विभागात रोजगार वाढत आहे. आरोग्य विभागात काम करू इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध गट क श्रेणीच्या पदभरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 ऑगस्ट 2021 पासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

एकूण 2725 पदांची भरती

गट क श्रेणी अंतर्गत, हाऊस कीपर ड्रेसर, स्टोअर गार्ड, प्रयोगशाळा अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ, ब्लड बँक तंत्रज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या एकूण 2725 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. पदांसाठी पीजी डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर आणि इतर शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. भरतीशी संबंधित सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये पाहता येईल.

आरोग्य विभाग भरती 2021 साठी अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार 6 ते 20 ऑगस्ट 2021 पर्यंत महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट घेऊ शकतात.

Comments are closed.