Take a fresh look at your lifestyle.

माय मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न होणे आवश्यक- प्रा.हनुमान व्हरगुळे

सेलू :- भाषा आहे म्हणून संवाद आहे आणि संवाद आहे म्हणून भाषा टिकून आहे. लिपीची भाषा म्हणजेच भाषा नव्हे तर, भाषेची इतरही अनेक रुपे आपल्या ओघवत्या शैलीत आपल्या व्याख्यानातून प्रा.हनुमान व्हरगुळे यांनी स्पष्ट केली.

राज्याची भाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्य शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने सेलू येथील गटसाधन केंद्राच्या वतीने प्रा.हनुमान व्हरगुळे यांचे ता २८ जानेवारी रोजी ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी माय मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून तालुक्यातील शाळे- शाळेतून चालू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करत‌ मराठी भाषा संवर्धनासाठी आणखी कोणते उपक्रम राबवता येतील हे यावेळी नमुद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डी.डी.साबळे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद ठाकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता काळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तंत्रस्नेही शिक्षक पी‌.डी‌.कुलकर्णी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक व गटसाधन केंद्रातील विषय तज्ञ उपस्थित होते.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.