Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील २९ गावांमध्ये लॉकडाउन…

अहमदनगर : कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील २९ गावांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. येत्या ता. २३ पर्यंत ही गावे लॉकडाउन असतील. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत अध्यादेश काढला आहे. संगमनेर तालुक्‍यातील सर्वाधिक तेरा गावांचा यामध्ये समावेश आहे.

तालुके आणि गावे याप्रमाणे : संगमनेर- उंबरी, वेल्हाळे, चंदनापुरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बुद्रुक, जोर्वे. अकोले- वीरगाव, सुगाव बुद्रुक, कळस बुद्रुक. पारनेर- जामगाव, वासुंदे, कोपरगाव- टाकळी. नगर- पिंपळगाव माळवी. श्रीगोंदे- लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ.
काही गावे अंशतः लॉकडाउन करण्यात आली आहेत, ती अशी : पारनेर- निघोज, संगमनेर- घुलेवाडी, घारगाव, गुंजाळवाडी, श्रीगोंदे- काष्टी, राहाता- लोणी खुर्द, लोणी बुद्रुक, कोल्हार बुद्रुक. या गावांतील काही भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या गावांमधील अत्यावश्‍यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. शाळा आणि धार्मिक स्थळेही बंद ठेवावी लागणार आहेत.

Comments are closed.