Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक: बॉयफ्रेडसोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर चोरांनी केला सामूहिक बलात्कार, जाणून घ्या कुठे घडली घटना

क्राईम: देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. तरीही देशातील स्त्री आज असुरक्षित आहे. रोज शेकडो महिला आणि मुलीवर बलात्कार होण्याच्या घटना घडत आहेत.  कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. येथे चोरांनी एका मुलीचा सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी तिच्या प्रियकरासोबत दुचाकीवर फिरायला गेली असताना ही घटना घडली. तसेच तिच्या कथित प्रियकराला चोरांनी पैसे न दिल्याबद्दल बेदम मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली, जेव्हा मुलगी आपल्या मित्रासोबत घरी परतत होती.

मुलगी तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत चामुंडी टेकडी परिसरात गेली होती. त्यावेळी सहा तरुणांच्या टोळीने पीडितेला आणि तिच्या मैत्रिणीला मद्यधुंद अवस्थेत ललिताद्रिपुरा येथे नेऊन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्यासोबत असलेल्या मुलावर दगडाने हल्ला करून त्याला जखमी केले.

पीडित मुलगी उत्तर प्रदेशातून म्हैसूरला अभ्यासासाठी आली होती, असे सांगण्यात येत आहे.  ती एका खाजगी महाविद्यालयात शिकते. पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते धोक्याबाहेर आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली, दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांना दिले आहेत. बोम्मई म्हणाले, “मुलीच्या बयानाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जो कोणी दोषी असेल त्याला ओळखले जावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, असे निर्देश मी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.”

राज्याचे गृहमंत्री अर्गा ज्ञानेंद्र यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करून कठोर पावले उचलण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पोलिस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका