Take a fresh look at your lifestyle.

लखीमपुर हत्या प्रकरणी सेलूत महाविकास आघाडी तर्फे निवेदन

सेलू (डाॅ विलास मोरे) :-  उत्तरप्रदेशातील लखीमपुर तेथे शेतकरी आंदोलना दरम्यान केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडून हत्या केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. दरम्यान सदर आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सेलू येथे महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार ता. ११ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे शेतकऱ्यांनाच मान्य नाहीत. म्हणून गेल्या अनेक महिण्यापासून निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. लखीमपुर येथे सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रीय मंत्री मंडळातील गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलनात भरधाव गाडी घुसवून चार शेतकऱ्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सेलू येथे महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील क्रांती चौकात केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी व निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन दिले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हेमंत आडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माऊली ताठे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, राष्ट्रवादीचे डाॅ संजय रोडगे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र लहाने, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, काँग्रेसचे शहराध्यक्ष विनोद तरटे, रघुनाथ बागल, प्रदीप ढवळे, कॉ रामकृष्ण शेरे, कॉ रामेशवर पोळ, कॉ दत्तूसिग ठाकूर, सय्यद मुस्ताक रब्बानी, परवेज सौदागर, निर्मला लिपणे, मजिद बागवान, अनवर, सतीश भोसले, इस्माईल आदींची उपस्थिती होती.

Comments are closed.