Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे… ‘या’ महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव ऐकूनच थरथर कापायचे गुन्हेगार, आता स्वतः तलिबान्यांपासून जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे

तालिबान : अफगाणिस्तानच्या अशरफ गनी सरकारमध्ये उच्च श्रेणी पोलीस अधिकारी असलेल्या 34 वर्षीय गुलफरोज एबतेकार यांना सध्या आपला जीव वाचवण्यासाठी इकडे -तिकडे पळ काढावा लागत आहे . तालिबान त्यांचा वेड्यासारखा शोध घेत असून,  गुलाफरोज एबतेकार यांनी अमेरिकेसह अनेक देशांच्या दूतावासांना अफगाणिस्तानातून बाहेर जाण्यासाठी मदत करण्याचे आवाहन  केले होते, पण कोणीही त्यांना मदत केली नाही. मिररच्या वृत्तानुसार, तालिबानने काबूल विमानतळाबाहेर त्यांना मारहाणही  केली होती.

मिररच्या वृत्तानुसार, गुलफरोज एबतेकार अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे उपप्रमुख होत्या . अफगाण महिला त्यांना एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व मानत.  पण आज त्यांच्यासाठी स्वतःचा जीव वाचवणे देखील कठीण झाले आहे. तालिबानने त्यांच्यावर काबूल विमानतळावर हल्ला केला होता , पण  तिथून पळून जाण्यात त्या यशस्वी झाल्या.

गुलफरोज एबतेकार यांनी ब्रिटिश मीडियाला सांगितले कि, ” मी अनेक देशांच्या दूतावासांना मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी  विनंती केली होती. मी पाच दिवस विमानतळ निर्वासित शिबिरात देखील राहिले . मला प्रामाणिकपणे आशा होती की अमेरिकन मदत करतील, पण त्यांनी शेवटच्या क्षणी माझी  फसवणूक केली. आता माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नाही. जर तालिबानने मला पकडले तर ते मला ठार मारतील ‘.

अमेरिकन सैन्यांनी केली नाही मदत 

“जेव्हा मी विमानतळावर अमेरिकन सैनिकांना पाहिले तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला. मला वाटले आता आपण सुरक्षित आहोत, पण काही दिवसातच मला माझी चूक कळली. मी अमेरिकन सैनिकांना तोडक्या-मोडक्या इंग्रजीत समजावून सांगितले की माझा जीव धोक्यात आहे. मी त्यांना माझा पासपोर्ट, पोलिस आयडी आणि पोलिस प्रमाणपत्रही दाखवले, पण त्यांनी मदत केली नाही.” असा आरोप त्यांनी अमेरिकी सैनिकांवर लावला.

रशियात झाले शिक्षण 

गुलफरोज यांनी काही काळ रशियातही शिक्षण घेतले होते . म्हणून त्यांनी मदतीसाठी रशियन दूतावासाशी संपर्क साधला, पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली . विमानतळावरून परतताना, गुलफरोज यांच्या आईने त्यांना सांगितले होते की तालिबानी त्यांना  शोधत इथे आले होते.

तालिबानने अनेक वेळा नोकरी सोडण्याचा दिला होता इशारा 

तालिबान गुलफरोज यांच्यावर नोकरी सोडण्यासाठी सतत दबाव टाकत असे . अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यापूर्वीसुद्धा  तालिबाने  गुलफरोज यांना  अनेक वेळा इशारा दिला होता. तालिबानने त्यांना एक पत्र लिहून म्हटले होते की, पोलिसांची नोकरी महिलांसाठी नाही, म्हणून त्यांनी ही नोकरी त्वरित सोडली पाहिजे. पण गुलफरोज यांनी त्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आता तालिबानची सत्ता असल्याने गुलफरोज यांच्या आयुस्श्यावर बेतली आहे.

Comments are closed.