Take a fresh look at your lifestyle.

सेलू उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव

सेलू :- सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात औषधांसह विविध आरोग्य सुविधांचा मिळणे दुरापास्त झाले आहे. रूग्णांना आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात नसता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सेलू उपजिल्हा रूग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा असल्याचे येथील कर्मचारी सांगतात त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. स्त्रिरोगतज्ञ डाॅक्टर असुन सुध्दा प्रसुती साठी आलेल्या महिलांना परभणी येथे रेफर केले जाते. दंतरोग व अस्थीरोग तज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना इतर ठिकाणी जाऊन उपचार करावा लागतो. रुग्णालयात सी.बी.सी. सारख्या अनेक मशीन असताना तज्ञां अभावी धुळखात पडून आहेत. वैद्यकिय अधिकारी डाॅ गणेश काचगुंडे हे पदभार स्विकारल्या पासुन अद्याप हजर झाले नाहीत.

रूग्णांची वाढती संख्या पाहता परिचारिका कमी पडत आहेत. परिणामी उपजिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना अपेक्षित आरोग्य सुविधा मिळत नसल्याने इतर ठिकाणी जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. तालुक्यातील नागरीकांना सर्व आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात नसता आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक परभणी, आरोग्य उपसंचालक औरंगाबाद यांना देण्यात आला आहे. निवेदनावर शेख रफिक, अबरारबेग, लालूखाँन जिलाणी, शेख राजु, पठाण अलताफ यांच्या स्वाक्षर्‍या आहेत…

डाॅ. विलास मोरे, सेलू

Comments are closed.